ज्यूपीटर की फसीनो कोणती स्कूटर बेस्ट

दुचाकी म्हटलं की डोळ्या समोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे स्कूटरचं. पण स्कूटर म्हटलं की आपल्याला असं वाटतं की जवळच्या जवळ फिरण्यासाठी आपण स्कूटरचा वापर करतो. पण आता अनेक अशा स्कूटर आल्या आहेत, ज्या लांबच्या पल्यासाठी देखील वापरल्या जात आहेत.आता हेच पहा स्कूटर वापरणाऱ्याची संख्या मोठी आहे.

स्त्री वा पुरुष अनेकजण स्कूटर वापरतात. आज आपण जूपिटर आणि फसीनो या दोन्हीमधील सर्वात बेस्ट स्कूटर कोणती आहे, ते जाणून घेणार आहोत, तसेच त्या दोन्ही मधील फरक आणि त्यांच्या किंमती जाणून घेणार आहोत.

यामाहा फसिनो- यामाहा फसिनो 125 ही स्कूटर ही लांब मायलेज असलेली प्रीमियम स्टाइल स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीने पाच प्रकारात लॉंच केली आहे. यामध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे फ्यूल इंजेक्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. मायलेजबाबत यामाहा दावा करते की हे 125 68. 75 किमीचे मायलेज देत आहे.या गाड्यांची किंमत 72,500 रुपये ते 81,330 रुपये इतकी आहे.

tvs जूपिटर 125 – ही tvsची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने नुकतेच तिचे एक नवीन मॉडेल लॉंच केले आहे.कंपनीने यांचे तीन प्रकार बाजारात आणले आहेत. 124.8 सीसी इंजिन दिले आहे.जे 8.3 पीएस पॉवर आणि 10.5 एनएम पीक टॉक करते.जूपीटर 50 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देते.या स्कूटरही किंमत 73,400 ते 81,300 रुपये इतकी आहे.

तुम्ही तुमचा वापर किती आहे, कशासाठी वापणार आहात यावर तुम्ही तुमची आवडती स्कूटर निवडा.जर तुमचा वापर अधिक असेल आणि गाडीवरून वजन घेऊन जाणार असाल तर तुम्ही जुपिटर निवडू शकता.