नारायण राणे हा थर्ड क्लास माणूस आहे,अशा थर्ड क्लास माणसाला आम्ही कवडीची किंमत देत नाही  – खैरे  

Mumbai – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावर मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केलं. विराट मेळाव्यात त्यांनी भाजप, राज ठाकरे आणि शिंदे गटावर (BJP, Raj Thackeray and Shinde group) कडाडून हल्ला चढवला. गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ‘ट्रेलर’ दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाचा पंचनामा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे यांनी त्यांच्या खास शैलीत ठाकरेंवर टीका केली.

राणेंच्या टीकेला आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  नारायण राणे हा थर्ड क्लास माणूस आहे, ज्या भाषेत त्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, ते पाहता ते शुद्धीत बोलत होते का? हे तपासले पाहिजे, असा टोला खैरे (Chandrakant Khaire) यांनी लगावला.

काल मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेले तडाखेबाज भाषण अनेकांना झोंबले. त्यानंतर गद्दार आणि विरोधकांना चांगलाच पोटशुळ उठला आहे. (Narayan Rane) नारायण राणे हे त्यापैकीच एक असल्याची टीका देखील खैरे यांनी केली. खैरे म्हणाले, नारायण राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका करत असतात. अशा थर्ड क्लास माणसाला आम्ही कवडीची किंमत देत नाही.