कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक | द्रोणा स्पोर्ट क्लब आणि भैरवनाथ क्रीडा संस्था संघाना विजेतेपद

Pune : अतितटीच्या लढतीमध्ये महिला गटातून द्रोणा स्पोर्ट क्लब संघाने एमएच स्पोर्ट क्लब संघाला तर पुरुष गटातून भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाने चेतक, बालेवाडी संघाला पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नातूबाग मैदानावर (Pune) झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीमध्ये द्रोणा क्लब संघाने एमएच स्पोर्ट्स क्लब संघाला २७-२४ असे पराभूत केले. मध्यंतराला एमएच स्पोर्ट्स संघाने १३-९अशी ४ गुणांची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर भूमिका यादव, सई पिसे, काव्या गायकवाड यांनी जोरदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एमएच स्पोर्ट क्लब संघाकडून प्रतीक्षा करेकर, स्वप्नाली पासलकर, राखी जोशी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. महिला गटात शिवछत्रपती कबड्डी संघ तिसरे तर प्रकाश तात्या बालवडकर संघाने चौथे स्थान राखले.

पुरुष गटाच्या भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाने चेतक संघ बालेवाडीला ३२-२९ असे पराभूत केले. मध्यंतराला चेतक संघाने १८-१४ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात भैरवनाथ संघाच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. विजय लांडगे, आदित्य चौगुले, योगेश कड, संकेत लांडगे यांनी संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पराभूत संघाकडून आशिष पाडाळे, रुद्र पिंपळे, गणेश तापकीर यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

विजेत्या संघाना शहर प्रमुख गजानन थरकुडे, चंदन साळुंखे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, विलास सणस यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजक संजय नाईक आणि उमेश गालिंदे यांनी सामने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

Interim Budget 2024 | “आजच्या बजेटमध्ये विकसित भारताची गॅरंटी”; PM मोदींनी निर्मला सितारामन यांचं केलं कौतुक

Budget 2024 LIVE Updates: ‘वार्षिक 7 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही’, निर्मला सीतारमण यांची घोषणा