पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Pune Metro : पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या (Pune Metro) कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवेदन देणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

आज पुणे येथील शिवसेना भवन येथे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकार सहकाऱ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख श्री प्रमोद नाना भानगीरे, शिवसेना महिला पुणे शहर प्रमुख पूजा रावेतकर, सुधीर कुरूमकर, शिवसेना महिला पुणे जिल्हाप्रमुख कांता पांढरे, अॅड.गितांजली ढोणे , सीमा कल्याणकर, सारिका पवार , रंजना कुलकर्णी शिवसेना पुणे जिल्हा महिला समन्वयक, शर्मिला येवले यांसह अन्य मान्यवर, शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं आहे. शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असून त्याठिकाणी असलेला राडा रोडा, धूळ ताबडतोब हटवावी. मेट्रोच्यावतीने नेमण्यात आलेले वॉर्डन्सची संख्या वाढवली पाहिजे, त्यांना गणवेश दिला पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाने शहरातील नव्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्याचा समावेश वाहतूक कोंडीच्या यादीत केला पाहिजे.

तसेच लवकरच पुणे जिल्हा नियोजन निधीला अंतिम स्वरूप मिळणार आहे. पुणे शहरासह ग्रामीणसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी श्री दगडूशेठ हलवाई गणपती सकाळी ८ वा मंदिरात महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.८ व ९ फेब्रुवारी रोजी शहरात रूग्ण सेवा , ज्येष्ठांचे सत्कार ई विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे