काळया यादीतील कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची ‘सुपारी ?

काळया यादीतील कंत्राटदारांना 'पावन' करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची 'सुपारी?

मुंबई – मुंबई महापालिकेने २०१७-१८ मध्ये काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पावन करून घेण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांकडून व त्याच्या नातलगाकडून सुरु आहेत. हे उद्योग न थांबल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे तक्रार दाखल करू, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी दिला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कोटेचा बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये,  मुंबई पालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा , प्रदेश प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ, माजी नगरसेवक प्रवीण छेडा यावेळी उपस्थित होते.आ. कोटेचा यांनी सांगितले की. ९७५ कोटींच्या रस्ते बांधणीत गैरप्रकार केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या ९ कंत्राटदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाईही सुरु केली होती. त्यावेळी कंत्राटदारांबरोबर पालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरही कारवाई केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कंत्राटदार आणि अभियंत्यांना तुरुंगात जावे लागले होते.

या कंत्राटदारांना ७ वर्षे काळया यादीत टाकण्यात आले होते. या प्रकरणाची फाईल अजून बंद झालेली नसताना या कंत्राटदारांना पावन करून घेण्याची ‘सुपारी ‘ महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने व त्याच्या मावसभावाने घेतली आहे. या कंत्राटदारांना महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २२०० कोटींच्या रस्ते बांधणीची निविदा  भरता  येणार आहे. या पैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट्स या एका कंत्राटदाराला पालिकेच्या खातेअंतर्गत चौकशीच्या माध्यमातून निर्दोष ठरविण्यातही आले आहे. या विरोधात आपण लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालकांकडे मुंबई पालिकेच्या रस्ते प्रकल्प संचालकांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असेही आ. कोटेचा यांनी नमूद केले.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर

राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर

Next Post
'नवाब मलिक या शहरातील भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही'

‘नवाब मलिक या शहरातील भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही’

Related Posts

किरीट सोमय्या हे फालतू कार्यकर्ते आहेत, श्रीरंग बारणे यांचा हल्लाबोल

सोलापूर – परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचनालयाने छापे टाकल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी…
Read More

वाझेच्या पुर्ननियुक्तीसाठी ‘या’ नेत्याचा होता माझ्यावर दबाव; परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट

मुंबई – सचिन वाझे आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी अडचणीत येणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढू शकते अशी…
Read More
नीलम गोऱ्हे

खूप शिका, मोठे व्हा, पण आर के लक्ष्मण यांनी जिवंत केलेला कॉमन मॅन विसरू नका : नीलम गोऱ्हे

पुणे : विनोद हा बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतो. आर.के.लक्ष्मण यांनी नेहमीच सामान्य माणसाच्या डोळ्यांतल्या भावना ओळखून व्यंगचित्र काढली व…
Read More