Video: बर्थडे पार्टीला नग्न मॉडेल्सच्या अंगावर सर्व्ह केले जेवण, प्रसिद्ध रॅपरवर होतेय टीका

प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसाठी (Kanye West) हेडलाइन्समध्ये असणे ही नवीन गोष्ट नाही. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. आता कान्ये त्याच्या बर्थडे पार्टीमुळे चर्चेत आहे. कान्येच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये कान्येच्या वाढदिवसाच्या पार्टीत मॉडेल टेबलावर झोपलेल्या दिसत आहेत आणि त्यांच्या अंगावर जेवण वाढले जात आहे.

कान्ये वेस्टने 8 जून रोजी त्याचा 46 वा वाढदिवस (Kanye West Birthday Bash) साजरा केला. वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर आल्यावर एकच गोंधळ उडाला. या फोटोंमध्ये मॉडेल टेबलावर नग्न अवस्थेत झोपलेल्या दिसत आहेत आणि त्यांच्या अंगावर सुशी वाढण्यात आली आहे. हे फोटो पाहून लोक हैराण झाले असून ते याला कान्येची सर्वात मोठी चूक म्हणत आहेत.