अखेर ‘त्या’ निर्लज्ज कॉंग्रेस आमदाराने मागितली माफी…
बेळगाव : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,’ असे सभापतींनी आमदारांना सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितलं की, ‘एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.
अखेर रमेश कुमार यांची अक्कल ठीकाण्यावर आली असून त्यांनी आपल्या बेताल आणि निर्लज्ज वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. ‘या गंभीर गुन्ह्याला हसण्यावारी नेण्याचा किंवा तो क्षुल्लक आहे असं सांगण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. ती फक्त एक टिप्पणी होती. यापुढे मी माझे शब्द योग्यप्रकारे निवडेन,’ असं ट्वीट रमेश कुमार यांनी केलं आहे.
I would like to express my sincere apologies to everyone for the indifferent and negligent comment I made in today’s assembly about “Rape!” My intention was not trivialise or make light of the heinous crime, but an off the cuff remark! I will choose my words carefully henceforth!
— K. R. Ramesh Kumar (@KRRameshKumar1) December 16, 2021
कॉंग्रेस आमदारच्या या खालच्या पातळीच्या वक्तव्यावर आता देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ज्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासारखी एक सक्षम स्री आहे. ज्या पक्षाचे शीर्ष नेतृत्व प्रियांका गांधी यांच्यासारखी एक संवेदनशील नेता करते अशा कॉंग्रेस पक्षात रमेश कुमार यांच्यासारख्या निर्लज्ज आमदारावर काही कारवाई होणार का ? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.