भर कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाचा हात!

मुंबई- काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासोबत सेल्फी घेण्यावरुन मोठा वाद झाला होता. सेल्फी देण्यास नकार दिल्याने काही चाहत्यांनी मिळून त्याच्या गाडीवर हल्ला केला होता. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर अशीच काहीशी घटना प्रख्यात गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यासोबत घडली आहे. सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याची मोठी बातमी समोर आलीय.

चेंबूरमधील एका कार्यक्रमात सोनू निगमवर धक्काबुक्की करण्यात आली. सेल्फी काढण्यावरुन वाद झाल्याने ही धक्काबुक्की करण्यात आल्याची चर्चा आहे. संबंधित घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु झालाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचा अंदाज आहे.

ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आलीय. सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हेही तिथे होते. या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकीं झाल्यानंतर स्वप्नील यांनीदेखील एका अंगरक्षकाला धक्का दिला त्यावरन हा वाद झाल्याचं समोर येतंय. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगमला इजा झाली नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे.