कोणीतरी येणार गं..! भारतातला पहिला ट्रान्समेल बाबा, केरळच्या ट्रान्सकपलने दिली Good News

Kerala Trans Couple Pregnant: केरळचे ट्रान्सकपल जहाद फाजील (Zahhad Fazil) आणि जिया पावल (Ziya Paval) यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे गरोदरपणाची घोषणा केली आहे. जोडप्याने त्यांचे काही फोटोही शेअर केले आहेत. भारतातील ही पहिली ट्रान्समॅन गर्भधारणा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गरोदरपणाची तारीख मार्च महिन्यातील आहे.

जिया आणि जहाद या केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. जोडप्याने त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये काही फोटोही शेअर केले आहेत. कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, या जोडप्याला लिंग बदलाची प्रक्रिया सुरू असताना गर्भधारणेसाठी कोणत्याही शारीरिक आव्हानाचा सामना करावा लागला नाही.

जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. जहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. या ट्रान्स दाम्पत्याने ठरवले आहे की, मुलाला दूध डेअरीतून आईचे दूध पाजले जाईल.

भारतातील मुलाला जन्म देणारा जहाद हा पहिला ट्रान्समॅन असेल, असा दावा आता केला जात आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान जहादचे स्तन काढण्यात आले होते. जरी तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत. यामुळे तिला आता गर्भधारणा करता आली आहे.

जियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नाही. माझ्या आत एक स्त्री होती. मलाही मूल व्हावे आणि ते मला ‘आई’ म्हणतील, असे माझे स्वप्न होते.’