Ketaki Chitale | ‘सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे की…’, केतकी चितळेची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका

Ketaki Chitale – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारकडे मराठ्यांना स्वतंत्र्य नव्हे तर ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. यासाठी ते आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मनोज जरांगे चर्चेत असताना अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाही, असे केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली!

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. केतकी चितळेच्या पोस्टवर युजर्सने कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या पोस्टला सहमती दर्शवली. तर काहींनी केतकीवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही