Suhana Khan | सुहाना खानने खरेदी केली करोडोंची प्रॉपर्टी, शाहरुखच्या मुलीने लहान वयात मिळवले मोठे यश!

Suhana Khan Buys New Property : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हळूहळू वडिलांप्रमाणे बॉलिवूड मध्ये आपले पाय रोवत आहे. ओटीटीवर तिचे पदार्पण आधीच झाले आहे, आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे की सुहाना मोठ्या पडद्यावर कधी दार ठोठावेल. मात्र, किंग खानची मुलगी झपाट्याने नाव आणि प्रसिद्धी कमावत आहे. तिची लोकप्रियता इतर स्टार किड्सपेक्षा खूपच जास्त आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सुहाना खानला 4.8 मिलियन लोक फॉलो करतात. सुहानाच्या आयुष्यात काय चालले आहे? हे तिच्या सर्व चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. बॉलिवूडच्या बादशाहच्या मुलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सुहाना खान (Suhana Khan) भव्य संपत्तीची मालक बनली आहे
अशा परिस्थितीत आता सुहानाच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठे अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खानने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी एक नवे यश मिळवले आहे. आता तिच्या हातात मोठी उपलब्धी आली आहे. सुहानाने इतक्या कमी वयात प्रॉपर्टी खरेदी केली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सुहानाने मुंबईजवळील अलिबागमध्ये एक भव्य मालमत्ता खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही करोडोंची मालमत्ता आहे जी आता शाहरुख आणि गौरी खानच्या मुलीने स्वतः खरेदी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुहानाने अलिबागमधील रहिवासी भागात 7 हजार 820 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेली ही प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सुहानाच्या आलिशान मालमत्तेची किंमत किती आहे?
अभिनेत्रीच्या या आलिशान मालमत्तेची किंमत जवळपास 12 कोटी 91 लाख रुपये असल्याचं ऐकायला मिळतंय. त्यासाठी तिनी 77 लाख रुपये रोख रक्कम भरलीआहे. अभिनेत्री किती वेगाने यशाच्या पायऱ्या चढते आहे हे आता यावरुन सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत सुहाना खान लवकरच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?