Ravindra Waikar | ईडी चौकशीचा ससेमिरा लागलेल्या रविंद्र वायकर यांनी सांगितलं शिंदे गटातील प्रवेशाचं कारण, म्हणाले….

Ravindra Waikar | लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय दिग्गज नेते रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं.

पक्षप्रवेशाचं कारण सांगताना वायकर (Ravindra Waikar) म्हणाले, पहिले तर कोविड होतं त्यावेळी कामं झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीत पाहाल, 173 कोटी रुपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. लोकं रडत आहेत. आरेबाबत लोकं रडत आहे की, आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं असतं. अशा धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

माझ्या इथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यावहार करायचो. त्या 17 बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सुरु आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य