Priyanka Gandhi | कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी लवकरच पुणे दौरा करणार  

Priyanka Gandhi | पुणे लोकसभा मतदार संघामध्ये सुरुवातीला महायूतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच लढत होणार असे चित्र असताना मनसेला रामराम केलेले वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तिरंगी लढत होणार अशी चर्चा सुरू असताना आता ‘एमआयएम’कडून पुणे मानपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघात सुरुवातीला दुरंगी असलेली लढत आता चौरंगी झाली आहे. मात्र, या चौरंगी लढतीचा फायदा कोणाच्या पथ्यावर पडणार? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, यातच आता कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) लवकरच पुणे दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधी पुणे दौ-यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानंतर काँग्रेसनंही पुण्यात रॅली आणि सभेचं आयोजन केलंय.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांतील मविआ उमेदवारांसाठी, प्रियंका गांधी पुण्याचा दौरा करणार आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्यासह सचिन पायलट हेही त्यांच्यासोबत असणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन