आमची कायमची बुकिंग झालीय! सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न

जैसलमेर| सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचे लग्न (Sid-Kiara Wedding) झाले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. या लग्नाला करण जोहरपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

सिद्धार्थ ​​आणि कियारा यांच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत. कियारा अडवाणीने तिच्या लग्नाच्या दिवशी पावडर गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर सिद्धार्थ मल्होत्राने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. दोघांचे लग्नातील लुक्स एकदम किलर आहेत. दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर करत सारखेच कॅप्शन दिले आहे. ‘आमची आता कायमची बुकिंग झाली आहे. या प्रवासात आम्हाला तुमच्या आशिर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे’, असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 

दिल्लीत रिसेप्शन होणार 
जैसलमेरमध्ये लग्न केल्यानंतर आता सिद्धार्थ आमि कियारा दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर तो मुंबईत रिसेप्शन पार्टीही देणार आहे, ज्यात बी-टाऊनचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. सिद्धार्थचे मूळ शहर दिल्ली आहे.