आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा; शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

मुंबई – बंडखोर एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना (Eknath Shinde vs Shiv Sena) वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचला आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यासोबत शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरींना नोटीस बजावली आहे. तसेच, 5 दिवसांत आपली बाजू मांडत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलैला होणार असल्याने, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला ( Supreme Court Issues Notice Narhari Zirwal ) आहे.

त्यासोबत न्यायालयाने शिवसेनेचे बंडखोर 39 आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्तांची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचना महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत. राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane)  यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं की, काय स्पीड हाय राव…आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ला सुनावणी ठरवलीसुद्धा…निकालच लावून टाकायचा ना थेट…जय सुप्रीम कोर्ट. असं त्यांनी म्हटलं आहे.