मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआयचा पहिला उपमहापौर होणार – रामदास आठवले

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Elections) भाजप (BJP) आरपीआय (RPI) शिवसेना (Shiv Sena) महायुतीचा विजय निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजप चा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. 5 वर्षात पहिला अडीच वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी व्यक्त केला.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय च्या उमेदवारांना ही निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

भाजप चे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असे आश्वासन दिले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत असे सांगत आशिष शेलार यांनी रामदास आठवले यांच्यावर कविता करीत सभेत रंगत आणली.

2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 500 फूटांचे घर देण्यात यावे तसेच खाजगी इमारतींना काल मर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरा सारखे प्राधिकरण असावे, मुंबईत बंजारा भवन,कक्कया भवन बांधावे आशा विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले.