शिवसेना आमची आहे, असं सांगणाऱ्यांनीच आईला बाजारात विकलं – पेडणेकर 

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ (Bow & Arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी  (Thackrey Group) धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.  शिवसेना (Shiv sena) आमची आहे, असं सांगणाऱ्यांनीच आईला बाजारात विकल्याचं त्यांनी म्हटलं. खर तर हे सर्व दसरा मेळाव्यापासून सुरू झालं. शिवसेनेने दसरा मेळाव्यात आपली ताकत दाखवून दिली. त्यानंतर निर्णय घेण्याची झालेली घाई सर्व जनतेने पाहिली. शिवसेना पक्ष नव्हे तर एक कुटुंब आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही खचणार नाही, घाबरणार नाही असं पेडणेकरांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी भाजपावर देखील निशाणा साधला आहे.