IND Vs SA: टीम इंडियाला मोठा झटका, कर्णधार केएल राहुल मालिकेतून बाहेर, पंतकडे नेतृत्व 

नवी दिल्ली-  टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND Vs SA)  9 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेला केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आहे. KL राहुलची दुखापत इतकी गंभीर आहे की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेचा भाग असणार नाही. या मालिकेसाठी बीसीसीआयने ऋषभ पंतची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

केएल राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण बीसीसीआयने पुष्टी केली आहे की केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेचा भाग असणार नाही. विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर केएल राहुल टीम इंडियाचा भाग असेल की नाही याबाबतची परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

मालिका सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की केएल राहुल न खेळल्यास संघाची कमान ऋषभ पंतकडे असेल. मात्र बीसीसीआयकडून उपकर्णधाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.(kl-rahul-ruled-out-of-series-against-south-africa).