KRK ने त्याच्या नावातून खान काढून टाकले, आता ‘हे’ असेल नाव

मुंबई – अभिनेता कमाल राशिद खान उर्फ केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.  केआरके ट्विटरवर प्रत्येक चित्रपटाचे रिव्ह्यू देतो. कमाल त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याने त्याच्या ट्विटर प्रोफाइलवर त्याचे नाव बदलले आहे. अभिनेत्याने त्याच्या नावातून खान काढून टाकले आहे आणि पत्नीचे आडनाव बदलले आहे. केआरकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

केआरकेने ट्विट करून लिहिले की, ‘मी माझ्या नावातून खान काढून टाकतो आणि माझ्या पत्नीचे आडनाव कुमार जोडतो. माझ्या पत्नीचे नाव अनिता कुमार आहे. म्हणूनच माझे नाव कमाल रशीद कुमार असणार आहे. अभिनेत्याच्या या निर्णयाने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे मात्र, केआरकेने यामागचे कारण दिलेले नाही.(KRK removed Khan from his name).

https://twitter.com/kamaalrkhan/status/1560840488399343616?s=20&t=lXDZvcKgjJSgC-GZ00Rrvg