“पतीला देवाचा दर्जा देण्याची वेळ संपली..” अभिनेत्री मोना सिंगच्या वक्तव्याची चर्चा

Actress Mona Singh: बऱ्याचदा सिने अभिनेते आणि अभिनेत्री वेगवेगळ्या मुद्द्यांवर अशी काही वक्तव्ये देतात, जी चर्चेचा विषय बनतात. बॉलीवूड अभिनेत्री मोना सिंह ही नुकतीच एका मुलाखतीत भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि पतीला परमेश्वर मानन्याबद्दलच्या  रुढीवर मोकळेपणाने बोलली आहे.

या मुलाखतीत मोना म्हणाली, “मी जेव्हा ‘क्या हुआँ तेरा वादा’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा बऱ्याच महिलांना माझ्या भूमिकेतून प्रेरणा मिळाली. मला बऱ्याच लोकांचे तेव्हा मेसेज यायचे. जेव्हा एखादी महिला खचून पुन्हा उभी राहते, तेव्हा ती अधिक स्ट्राँग होते. इतक्या वर्षांपासून महिलांना दबावाखाली ठेवलंय. त्यांना प्रत्येक गोष्टीत रोखलं जातं. हे करू नका, ते करू नका. पतीला देवासमान समजा. मात्र आता हा ट्रेंड संपला आहे. आता सात जन्मांसाठी एकच पती आणि पतीला देवाचा दर्जा देण्याची वेळ संपली आहे. या बदलाने मी खूप खुश आहे. आता महिलांसोबत काहीही चुकीचं घडलं तर ती स्वत: त्याविरोधात उभी राहू शकते आणि लढू शकते.”