उज्जैनमधील भगवान कुबेराचे ‘हे’ मंदिर आहे खास, धनत्रयोदशीला मूर्तीच्या नाभीवर तूप लावल्याने मिळते धनसंपत्ती

Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर (Kuber God) यांची पूजा केली जाते. जाणून घ्या भगवान कुबेरचे असे अनोखे मंदिर जिथे त्यांच्या नाभीवर तूप लावल्याने धनसंपत्ती मिळते.

धनत्रयोदशीचा सण शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान कुबेराची पूजा केली जाते. उज्जैनचे कुबेराचे प्रसिद्ध मंदिर म्हणजे, कुंडेश्वर महादेव मंदिर. येथे भगवान कुबेर यांची 1100 वर्षे जुनी मूर्ती सापडली होती. कृष्ण बलराम आणि सुदामा यांच्यासोबत शिकत असताना भगवान श्रीकृष्णाला ही मूर्ती मिळाली होती. यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला गेले पण भगवान कुबेर तिथेच बसले आहेत. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी या कुबेराच्या मूर्तीच्या नाभीवर तूप लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. म्हणूनच लोक खास दिवाळीच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिराला भेट देण्यासाठी येतात आणि कुबेरजींच्या नाभीला तूप लावतात.

या दिवशी कुबेरजींच्या नाभीवर तूप मिसळलेला अत्तर लावला जातो. कुंबरजींना पिवळा रंग खूप प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी त्यांना पिवळ्या रंगाची मिठाईही अर्पण केली जाते.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर