पहिल्यांदाच इरफानच्या पत्नीने दाखवला चेहरा, अफगाणी संघाला दिलेल्या पार्टीत दिसली बुरख्याशिवाय

Irfan Pathan Wife: अफगाणिस्तान संघाने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी (Afghanisatn Team) आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. जागतिक दिग्गज देखील या संघाचे कौतुक करत आहेत, तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) संपूर्ण संघाचा चाहता झाला आहे, त्याने रशीद खानसोबत मैदानात भांगडा देखील केला होता आणि आता त्याने आपल्या घरी अफगाणिस्तान संघाला पार्टी दिली आहे.

प्रसिद्ध गायक अदनान सामी आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनीही इरफानच्या पार्टीला हजेरी लावली. इरफानने स्वतः पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

पार्टीत इरफानची पत्नी सफा बुरख्याशिवाय दिसली
ज्यामध्ये लोकांना एक खास गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे इरफानच्या पार्टीच्या फोटोंमध्ये त्याची पत्नी (Irfan Pathan Wife Safa) सफा बुरख्याशिवाय दिसली, जे लोकांसाठी एक मोठे आश्चर्य आहे. कारण इरफानची पत्नी सफा अनेकदा बुरख्यात दिसली आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये इरफान पत्नीच्या गळ्यात हात टाकून थांबलेला दिसत आहे. लोकांनी या जोडप्याचे मनापासून कौतुक केले आहे. काही लोक त्यांना परफेक्ट कपल म्हणत आहेत. तर काही लोकांनी सफा इरफान पठाणला खूप सुंदर म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर