कोळसा तुटवडयाला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार – नवाब मलिक

nawab malik and modi

मुंबई : देशात कोळसा तुटवडा निर्माण झालाय त्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

देशात कोळसा मिळत नाहीय. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच बंद पडले आहेत. आयात कोळसा करुनही तो उपलब्ध होत नाहीय. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन आहे ते जास्त खर्च होतेय असेही नवाब मलिक म्हणाले.

युपीए सरकार असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे याची निर्मिती झाली पाहिजे त्याची पॉलिसी निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या त्या आजपर्यंत त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

कोळशाच्या तुटवडा…

खाणीत कोळसा असताना खणीकरण होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो या सगळ्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Previous Post
अजित पवारांना शरद पवारांनीच उभे केले, अजितदादांच्या आईंचे शरद पवारांवर स्तुतीसुमने

अजित पवारांना शरद पवारांनीच उभे केले, अजितदादांच्या आईंचे शरद पवारांवर स्तुतीसुमने

Next Post
जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल - राजू शेट्टी

जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल – राजू शेट्टी

Related Posts

टाइम मासिकाने 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली, ‘या’ नावांचा समावेश आहे 

नवी दिल्ली – टाइम मासिकाने 2022 मधील जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत…
Read More
स्वयंपाकघर

Smart Home Appliances ज्याशिवाय तुमचे स्वयंपाकघर अपूर्ण आहे, जाणून घ्या कोणती आहेत ती उपकरणे

बाजारात अनेक स्मार्ट किचन उपकरणे उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता.त्यांचा वापर करणे खूप…
Read More
देशात व राज्यात परिवर्तनाचे चित्र, भाजपाचे पानिपत करु; नानांची डरकाळी 

देशात व राज्यात परिवर्तनाचे चित्र, भाजपाचे पानिपत करु; नानांची डरकाळी 

मुंबई – राज्यात सध्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा…
Read More