Sharad Pawar | लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची, शरद पवार यांचे वक्तव्य

Sharad Pawar | विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या जाहीर सभेत बोलताना विखे यांच्यावर केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, असा निरोप उद्योजक घेऊन आला होता. हा निरोप महसूलमंत्र्यांना उद्योजकामार्फत पाठविला होता असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी ची निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडत आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आहे. वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारांवर गदा येईल, संकट येतील. ते होऊ द्यायचे नाही. गेले दहा दिवस मी वाचत आहे असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मोदी साहेब बोलताहेत, देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखी काही नेते बोलत आहेत. या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार, आमच्या विरोधात हा खोटा प्रचार आहे. आम्ही नाही प्रचार केला. केंद्र सरकारचे एक मंत्री आहेत, त्यांचे नाव हेगडे त्यांनी एक भाषण केलं लोकांसमोर या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत नाही, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय. तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन कोणी राजकारण करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. या घटनेने सर्वांना सारखे अधिकार दिले. तुम्हाला जसे अधिकार आहे मलाही तसेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैशिष्ट्य हे आहे, की समान संधी, समान अधिकार. त्या समान अधिकारावर जे संकट यायलं लागलं आहे, त्यावेळेला आपण सर्वांना जागृत राहणं आणि जे आणतात त्यांना दूर ठेवणं हे काम आपल्याला करायचे आहे. ते सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं. असेही शरद पवार यांनी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, माझ्या वाचण्यात आले. विरोधी उमेदवारींना प्रश्न उपस्थित केला की संसदेमध्ये इंग्रजीत बोलायचे असते. संसदेमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे. मी स्वतः इंग्रजी आणि हिंदीत आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोलतो आहे. मराठीत बोलण्याचा अधिकार आहे. हिंदी आणि इंग्रजीचे भाषांतर करण्याची सुविधा असते असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला