बोंबला ! संजय राऊतांमुळेच ललित पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत ? 

Lalit Patil ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अंमली पदार्थांप्रकरणी पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. यातच आता आणखी महत्वाची माहिती समोर येत आहे. संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचे नेते असताना नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ड्रग्जमाफिया ललित पाटील याला उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधण्याचं काम राऊतांनीच केले असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केला आहे.

पहिल्या दिवसापासून ड्रग्ज विषयात कुणाचे समर्थन असण्याचे प्रश्न उद्भवत नाही. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी होणे गरजेचे आहे असंही भुसेंनी सांगितले. दादा भुसे म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरे गटाने काल मोर्चा काढला. मोर्चात सहभागी लोकं कशासाठी आलेत हे त्यांना माहिती नाही हे माध्यमांनीच दाखवले.

ठाकरे गटाची दुखणी वेगळी आहेत. त्यांची दुखणी लवकरच जनतेसमोर येतील. पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर