‘संजय राऊत रवी राणा बरोबर मेजवानी करत आहेत आणि बिचारे सैनिक एका थंड शिव वडा पावच्या बोलीवर कामाला लागलेत!’

पुणे –    शिवसेनेलाच (Shiv Sena) शिंगावर घेणाऱ्या राणा दाम्पत्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत (Sanjay Rauts photo with Rana Couple Viral).  आमदार रवी राणा आणि संजय राऊत यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.  रवी राणा  आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसेवरुन (Hnuman Chalisa) अख्खे राज्य डोक्यावर घेतले होते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackrey) घरासमोर हनुमान चालिसेचे वाचन करणार असे रवी राणा- नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर राज्यात बराच गदारोळ झाला होता. मात्र आता या सर्वांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्याने कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले आहेत.

याच मुद्द्यावरून प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्या म्हणाल्या, सामान्य शिवसैनिक कामधंदा सोडुन, भर उन्हा-तान्हात मातोश्रीवर (Matoshree) राडा करायला गेले नवनीत आणि रवी राणा ह्यांच्याविरुद्ध. ‘माझ्या पोराला नोकरी आणि मला एक घर द्या’ म्हणणारया आजी पण गेल्या चान्स वर डान्स करायला. पूर्ण दिवस वाया घालवून, राणा दांपत्याला सोशल मिडियावर घाणेरड्या शिव्या देऊन काय मिळालं त्यांना ?

तिकडे नवनीत राणाला ‘२० फूट जमीनीखाली गाडायची’ भाषा करणारे संजय राऊत इकडे लेहच्या (Leh) थंड हवेत रवी राणा बरोबर मेजवानी करत आहेत आणि बिचारे सैनिक एका थंड शिव वडा पावच्या बोलीवर कामाला लागलेत ! हा धडा काही हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या लोकांसाठी पण आहे, केवळ हनुमान चालीसा म्हटला आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भोंगे (Loudspeaker) हटवा भूमिका घेतली म्हणून कुणी लगेच हिंदूत्वाचा कैवारी होत नाही !