आमच्या ललितने काही मोठा गुन्हा केलेला नाही; हजारो युवकांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या ललितच्या आईची प्रतिक्रिया

Lalit Patil दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरु इथून अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अमली पदार्थ तस्करी (Drug trafficking) प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तिकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला आता हजारो तरुणांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या ललित पाटीलच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. ललितची आई म्हणाली, त्याने काही मोठा गुन्हा केला नाहीय. त्यामुळे त्याचं एन्काऊटर करण्याचं काहीच कारण नाही. एवढे मोठे मोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. मग ललितने काय केलंय असं? त्यामुळे त्याचा एन्काऊंटर करू नका. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई-वडिल आहेत.

त्याला फसवलंय हे त्याने सांगावं. जे शिक्षा देतील त्याला सामोरं जावं. तो फसला गेलाय त्यामुळे तोही घाबरून गेला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय त्यामुळे त्याने सांगावं की त्याला फसवलं गेलंय. पैशांसाठी त्याला टॉर्चर केलं गेलं. म्हणून त्याने पलायन केलं. राजकारणीही तेच म्हणत आहेत की त्याने एवढा काय गुन्हा केलाय. त्याचं हर्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले की आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुला नेलं तर तू जगू शकणार नाही. म्हणून तो घाबरून निघून गेला, असंही ललितची आई म्हणाली.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा