lalit patil : वकिलीनबाई कशी पडली पडली ड्रग्समाफिया ललित पाटीलच्या प्रेमात? जाणून घ्या सर्व काही

lalit patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अंमली पदार्थांप्रकरणी पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. यातच आता आणखी महत्वाची माहिती समोर येत आहे. ललितची पहिली बायको (Lalit Patil First Wife) ही अपघातात गेली. त्यानंतर त्याची ओळख एका वकिलीनबाईशी (Lalit Patil Girlfriend) झाली. नंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. एवढंच नाहीतर ती त्याच्या मुलांचाही सांभाळ करते अशी माहिती समोर आली आहे.

न्यूज १८ लोकमतने दिलेल्या माहितीनुसार,  ललित प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत प्रज्ञा ही व्यवसायाने वकील असून ललितच्या बऱ्याच व्यवहारामध्ये तिचा सहभाग आहे.पहिल्या पतीसोबत फारकत झालेली नसल्याने ती ललित सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

ललितची आणखी एक मैत्रीण होती जिचे नाव अर्चना निकम असे आहे.ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर