शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे निंदनीय – जोशी 

पुणे  – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media)  चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान,  केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजपचे पुनीत जोशी (BJP Leader Puneet Joshi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार साहेब हे जेष्ठ नेते आहेत. अश्या प्रकारची वक्तव्य आणि विशेष करून त्यांचा प्रकृतीवर करणं हे निंदनीय  आहे. हल्ली राजकीय नेत्यांना ट्रोल (Troll) करण्यासाठी अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करणे सुरु आहे हे महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे.