भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक- आमदार राजेश टोपे

Rajesh Tope: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला ३ जानेवारी पासून सुरुवात झाली होती. आज या शिबिराच्या अंतिम दिवशी या शिबिराला संबोधित करतांना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार  राजेश टोपे म्हणाले, राजकारणातील कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार फार महत्वाचा आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले की, राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तैवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे शरद पवार साहेब आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत. शरद पवार साहेब एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. शरद पवार साहेबांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात