दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू; मुंबईच्या गोविंदांवर शोककळा

मुंबई : राज्यात दोन दिवसांपूर्वी दहिहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र आता एक दुखद बातमी समोर येत आहे. दहिहंडीमध्ये जखमी झालेल्या मुंबईतील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. संदेश दळवी, असं मृत्यू झालेल्या गोविंदाचं नावं आहे.

संदेशच्या डोक्याला इजा झाली होती. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात अँडमिट केल होतं. डोक्याची शस्रक्रिया झाली होती, पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीची झुंज अपयशी ठरली. संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावणे यांनी उपचारासाठी मदत केली असल्याचं त्यामध्ये दिसून येतं.