कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत

मुंबई – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत काल सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत झालं.

शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी अल्पकालीन चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला होता. हा प्रश्न तातडीनं निकाली निघावा हीच राज्य सरकारची भावना असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना याविषयी माहिती देवून बैठक आयोजित केली जाईल आणि यासाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची बैठकही घेतली जाईल, असं असं मराठी भाषाविभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी, मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारनं राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या लेखी आश्वासनांची मुदत संपूनही काहीही कार्यवाही झालेली नसल्याचा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला. याबाबत राज्य सरकारनं विधानसभेत निवेदन करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश तालिका पीठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिले.