राम गोपाल वर्मांनी प्रोमोशनसाठी ओलांडल्या सर्व मर्यादा! अभिनेत्रीच्या पायाशी बसले अन्…

कधीकाळी बॉलीवूडच्या टॉप दिग्दर्शकांपैकी एक राहिलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) सध्या फक्त तेलुगू सिनेमांचे दिग्दर्शन करताना दिसत आहेत. दिग्दर्शक राम गोपाल हे त्यांचा चित्रपट प्रसिद्ध करण्यासाठी कोणत्याही सीमेपलीकडे जाऊन प्रोमोशन करताना दिसतात. यामुळे बऱ्याचदा राम गोपाल यांना ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागते. नुकतेच सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

दिग्दर्शक राम गोपाल यांनी त्यांच्या आगामी चित्रपट डेंजरसचे प्रोमोशन करताना सर्व सीमा ओलांडल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ते चक्क अभिनेत्रीला फूट मसाज देताना दिसले आहेत. त्यांचे अभिनेत्रीला फूट मसाज देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

 

दिग्दर्शक राम गोपाल हे त्यांच्या आगामी सिनेमा डेंजरसमधील अभिनेत्री नैना गांगुलीला फुट मसाज देताना कॅमेरात कैद झाले आहेत. त्यातही विचित्र गोष्ट म्हणजे, ते त्यांच्या हातांनी नव्हे तर तोंडाने अभिनेत्रीला फूट मसाज देत आहेत. यावेळी राम गोपाल नैना गांगुलीच्या पायांजवळ खाली जमिनिवर बसलेले आहेत. तर नैना गांगुली सोप्यावर बसली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्वत: दिग्दर्शक राम गोपाल यांनी त्यांच्या अकाउंटवर नैना गांगुलीला फूट मसाज देतानाचे फोटो शेअर केले आहेत.