Loksabha Election 2024 | छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा लढवू नये म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांना मालोजीराजेंचे सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देऊ शकते. मात्र अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये, असे म्हटले होते. यावर आता माजी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati on Hasan Mushrif) यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.

मालोजीराजे म्हणाले, की महाराजांनी निवडणूक (Loksabha Election 2024) लढवली पाहिजे ही सर्वच घटकांमधून चर्चा सुरू आहे. टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहिले पाहिजे. मात्र महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर सर्व अवलंबून आहे. ते चांगला निर्णय घेतील अशी आशा असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर लढलं पाहिजे याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, चांगल्या, प्रामाणिक माणसाने राजकारणात उतरू नये का? अशी विचारणा त्यांनी केली. चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेज, चांगलं काम झालं पाहिजे तर मग त्याला शाहू महाराज एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. यामध्ये गैर वाटण्याचं काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे का? यावर बोलताना त्यांनी ही लोकशाही असून आणि लोकशाहीमध्ये जनताच ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान