Loksabha Election 2024 | ‘महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम…’, अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव येथे सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 वर्षांचा हिशोब मागताय, मात्र जनता 50 वर्षांपासून तुम्हाला सहन करतेय, अशा शब्दांत अमित शाह यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“५० वर्ष महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न, एक तरुण शुन्यातून जग निर्माण करणारा ते इथंपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राने त्यांचा बघितला. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण (Loksabha Election 2024) केले म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या टीकेला दिले.

“महाराष्ट्रातील आज सर्व मान्यता आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून मानतात त्यांना पाठिंबा देतात. आजही ते सर्वांना हवेहवेसे वाटतात, असंही जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकत शरद पवारांची आहे, प्रतिमा मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशा गोष्टी होणे स्वभाविक आहे, ‘शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेले काम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचे काम तसेच किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे काम महाराष्ट्र विसरलेला नाही, असंही पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान