Loksabha Election : ठाकरे गटाची २३ जागांची मागणी कॉग्रेसने फेटाळली; ठाकरेंचा दरारा संपला?

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआमध्ये मात्र धुसफूस सुरु झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार एकथान शिंदे यांच्या ताफ्यात आहेत.शिवसेनेने मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा, काँग्रेस पक्षाने नाकारल्या आहेत.

काँग्रेस नेत्यांच्या मते, शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झालंय. त्यांच्याकडून अनेक नेत सत्तेत गेलेत. त्यामुळे काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे. हाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात. पण सध्याच्या परिस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होतेय. असे म्हणत चव्हाण यांनी ठाकरेंची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे भाजपसोबत असताना जो ठाकरेंचा दरारा होता तो संपला का असा सवाल आता उपस्थित होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’