मांसाहार करून देवदर्शनाला जाणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यावर आनंद दवे यांची टीका, म्हणाले, इतका पुरोगामीपणा…

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर (Facebook) एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे या दोन तरुणांशी संवाद साधत आहे. एका हॉटेलमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही तरुणांनी मटन थाळी ऑर्डर केली होती, यावेळी, सुप्रिया सुळे यांनी या तरुणांशी बोलताना आपण सुद्धा अशीच थाळी खाली असं म्हटलं आहे. हाच धागा पकडून शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांनी मटण थाळी खाऊन महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पुण्यातील (Pune) एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं, असा आरोप केला आहे.दरम्यान, याच मुद्द्यावरून हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सुप्रिया ताईंनी पवार साहेबांकडून हिंदू (Hindu) धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्या आधी मांसाहार करू नये… किव्वा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये. पवार साहेबांनी पाळलेली ही तत्वे सुप्रिया ताईंनी सुद्धा पाळायला हवी होती… इतका पुरोगामीपणा निदान जाहीर पणे तरी बरा नव्हे ताई असं दवे यांनी म्हटले आहे.