National convention | भाजपने पक्षघटनेत बदल केला; आता निवडणुकीशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष करता येणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या (National convention) घटनेत काही सुधारणा केल्या आहेत. आता भाजप च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी (National President) निवडणूक घेण्याची गरज नाही. आता कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचे हे ठरवण्याचा अधिकार संसदीय मंडळाला आहे.

पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीनुसार हे पद रिक्त झाल्यास संसदीय मंडळाचे सदस्य थेट राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करू शकतील. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (Jagat Prakash Nadda) यांचा कार्यकाळही जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

जून 2019 मध्ये जेपी नड्डा (JP Nadda) यांना भाजपचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. 20 जानेवारी 2020 रोजी ते पूर्णवेळ अध्यक्ष झाले. जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या प्रस्तावाला जानेवारी 2023 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता राष्ट्रीय अधिवेशनानेही (National convention) त्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

गेल्या वर्षीच भाजपने जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. भावी अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या लांब आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून स्वातंत्र्य असेल, कारण पक्षाचे संसदीय मंडळ कोणत्याही निवडणूक पद्धतीशिवाय अध्यक्षाची निवड करू शकते.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा