Loksabha Election : महायुतीची आता खैर नाही; मविआतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने (Mahayuti) एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआ देखील व्यूहरचना करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आगामी लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, महाविकास आघाडीतील घटकपक्ष आपापल्या परिनं जागावाटपाचा फॉर्म्युला देत असल्याचं समोर येत आहे.

यापैकी मविआचा एक फॉर्म्युला सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जागा काँग्रेस (Congress),18 शिवसेना (Thackeray Group), 06 राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तर अकोला, आणखी एक जागा अशा 2 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्यात येईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. या फॉर्म्युल्याचे नेमके पुढे काय होणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’