विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांकडून बांगलादेशचा कर्णधार शाकिबला मारहाण! Video Viral

Shakib Al Hasan: 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) बांगलादेशची कामगिरी अत्यंत सामान्य होती. या संघाने दुसऱ्या दर्जाचे क्रिकेट खेळून आपल्या चाहत्यांची आणि जनतेची मने तोडली. आपल्या संघाच्या निराशाजनक कामगिरीने बांगलादेशचे समर्थक खूपच निराश झाले आहेत. चाहत्यांचा रागही उघड आहे. किमान या संघाने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास करायला हवा होता. पण असे होऊ शकले नाही.

सध्या बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक त्याच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. तर काहींनी उघडपणे त्याचे कपडेही ओढले. या बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेऊया..

कर्णधार शकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या संघाने अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशातच शाकिब अल हसनशी संबंधित एका दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की चाहते त्याच्यावर खूप निराश झाले आहेत आणि त्याच्याशी गैरवर्तन करू लागले आहेत.

हा व्हिडिओ 2023 च्या विश्वचषकातून परतल्यानंतर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की लोकांनी शाकिब अल हसनला चारही बाजूंनी घेरले आहे. कोणीतरी त्याची कॉलर ओढत आहे. लोक त्याला मारण्यासाठी मोठ्याने ओरडत आहेत.

मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ खूप जुना आहे. जेव्हा शाकिब एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची स्पर्धा लागली आणि त्यासाठी चाहते त्याच्याशी भांडू लागले होते, असे या व्हिडिओमागचे सत्य आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा