नव्या सरकारमध्ये माधुरी मिसाळ – महेश लांडगे यांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी ?

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खलबते थांबली आहेत. राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सरकार स्थापनेत एकनाथ शिंदे Eknath Shinde) महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

दरम्यान, उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. नेते देवेंद्र फडणवीस यांना मिठाई खाऊ घालत असल्याचे चित्रही समोर आले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आणि मिठाईही वाटण्यात आली.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देवेंद्र फडणवीस एकटेच शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिपदासाठी काही नेत्यांचा  नावांचा विचार पक्षाकाडून केला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे,  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार Chandrasekhar Bavankule, Sudhir Mungantiwar), आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विजयकुमार देशमुख,संजय कुटे आदी  नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्याचा विचार संघटना करत आहे.

भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), किशन कथोरे (Kishan Kathore), अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील, लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे, पुण्याच्या माधुरी मिसाळ, महेश लांडगे (Madhuri Misal, Mahesh Landage) यांच्या नावावर संघटना गांभीर्याने मंथन करत आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांचाही विचार केला जात आहे. मंत्रीपद देताना जातीय समतोल, विभागीय समतोल यांचा विचार केला जात आहे.अशी देखील माहिती समोर आली आहे.