Piyush Goyal | नवीन शैक्षणिक धोरण तरुणांसाठी हितकारक व लवचिक

Piyush Goyal | “वास्तविक जीवनात एखादा ‘3 इडियट्स’ चित्रपटातील माधवन नसेल, ज्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास भाग पाडले गेले. खरं तर ‘राजू’ ला छायाचित्रण आवडायचे. या उदा.चा संदर्भ देत उत्तर मुंबई भाजप महायुतीचेे उमेदवार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी मांडले. ते बोरिवली (प) येथे मधुरम हॉलमध्ये शेकडो शिक्षकांशी संवाद साधत होते.

पीयूष घोयल नवीन शैक्षणिक धोरण हे तरुणांचे हित लक्षात घेतेय असे ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ” मोदीजींनी हे सुनिश्चित केले आहे की नवीन शैक्षणिक धोरण लवचिक आणि नवीन पिढीच्या आणि काळाच्या गरजांनुसार आहे. आपले औपचारिक शिक्षण संपले तरी शिक्षकांची शिकवण कायम आपल्यासोबत राहते. तरुणांना घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे पंतप्रधान मोदीजींचे उद्दिष्ट आहे.

नवीन शैक्षणिक धोरण हे नवं भारताला आकार देण्याचा आधारस्तंभ आहे.” हे धोरण एखाद्याच्या आवडीनुसार करिअर निवडण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्व-अनुभव सांगताना ते म्हणाले मी स्वतःला नशीबवान मानतो की मी माझ्या आवडीचा कॉमर्स हा विषय निवडला.

“नवीन शैक्षणिक धोरण ३ लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्यानंतर तयार झाले आहे. कोणताही आक्षेप न घेता नवीन शैक्षणिक धोरण संसदेत मंजूर होणे हे या धोरणाच्या गुणवत्तेचा दाखला आहे जे सर्व पक्षांसाठी सर्वसमावेशक आणि लवचिक आहे.”

ते म्हणाले की राष्ट्रीय धोरणांमध्ये सातत्य राखण्यासाठी मोदीजींचे हात आपण बळकट केले पाहिजेत. यावेळी स्थानिक आमदार सुनील राणे, बोरिवली सुविद्या विद्यालयाचे चैरमेन गो.रा. रानडे आणि अनेक मान्यवर शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. रानडे गुरुजी यांनी पियुष गोयल यांचा सत्कार केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा