LokSabha Elections | “भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला

देशात लोकसभा निवडणुकीची (LokSabha Elections ) रणधुमाळी सुरू असून सर्व पक्ष कसून प्रचार करत आहेत. सत्ताधारी भाजपाने सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा संकल्प करताना ‘अबकी बार ४०० पार’चे ध्येय ठेवले आहे. पण हा नारा व्हॉट्सॲप विद्यापीठासाठी चांगला आहे. पण प्रत्यक्षात एवढ्या जागा मिळवणे भाजपाला शक्य होणार नाही, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी केली आहे.

ते म्हणाले, “भाजपाने राजस्थानमधील सर्व २५ जागा, गुजरातमधील २६, हरियाणातील १०, दिल्लीमधील ७, बिहारमध्ये ३९ किंवा ४०, उत्तर प्रदेशमध्ये ६२, पश्चिम बंगालमध्ये १८ आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणांहून ८० ते १०० टक्के जागा जिंकल्या तरी ते ३०० च्या आसपासच राहतात. तर दक्षिण भारतातील राज्यात १३० लोकसभा (LokSabha Elections ) मतदारसंघ आहेत. याठिकाणाहून भाजपाला १५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ४०० पार जायचे असेल तर भाजपाला शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काही जागा जिंकाव्या लागतील.” अशी उपहासात्मक टीका रेवंत रेड्डी यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला