राहुल गांधींच्या समर्थनार्थ निदर्शने करताना पी चिदंबरम यांची बरगडी फ्रॅक्चर

नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald case) गांधी कुटुंबियांना इडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गाधी (Congress leader Rahul Gadhi) यांची आज पुन्हा एकदा ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम (Former Union Minister P Chidambaram) यांना काल दिल्लीत पक्षाच्या निषेधादरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे, ज्यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला फ्रॅक्चर झाली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Congress chief spokesperson Randeep Surjewala) यांनी एक व्हिडीओ जारी करून म्हटले आहे की, दिवसभर काँग्रेस नेत्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल (Casey Venugopal) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. खासदार शक्तीसिंह गोहिल MP Shaktisinh Gohil) यांच्यावर हल्ला झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. मोदी सरकारने (Modi government) रानटीपणाची सर्व हद्द ओलांडली आहे, असा दावाही त्यांनी केला. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना पोलिसांनी मारहाण केली, चष्मा जमिनीवर फेकला, त्यांच्या डावी बरगडी फ्रॅक्चर (Left rib fracture) झाली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे