महेश बाबू आहे लॅम्बोर्गिनी-BMW सारख्या वाहनांचा मालक;  जाणून घ्या किती आहे त्यांची एकूण संपत्ती

हैद्रबाद – साऊथ सुपरस्टार  महेश बाबूने वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी बालकलाकार म्हणून साऊथ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. 1983 साली प्रदर्शित झालेला ‘पोरतम’ हा या अभिनेत्याचा डेब्यू चित्रपट होता. यानंतर महेश बाबू 1999 मध्ये ‘राजा कुमारुडू’मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसले. मग तो वेगाने प्रगतीच्या पायऱ्या चढत गेला.

महेश बाबूची गणना आज साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. लोकप्रियतेच्या बाबतीत तो हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांशी स्पर्धा करतो. एवढेच नाही तर कमाईच्या बाबतीतही तो कुणापेक्षा कमी नाही. महेश हे हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. या अभिनेत्याच्या घराची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे. याशिवाय महेश बाबूचा बंगळुरूमध्ये एक आलिशान बंगला आहे.

महेश बाबू हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक फी आकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबू एका चित्रपटासाठी 50-55 कोटी रुपये घेतात. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आता अभिनेत्याने त्याची फी वाढवली आहे. आता तो एका चित्रपटासाठी 80 कोटींची मागणी करतो. महेश बाबू बाबू स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालवतात. महेश बाबू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड असे त्याचे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूची एकूण संपत्ती 32 मिलियन डॉलर म्हणजेच 244 कोटी रुपये आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त, तो प्रॉडक्शन हाऊस, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर कंपन्यांमधील गुंतवणूकीद्वारे देखील कमाई करतो. अभिनेत्याला लक्झरी वाहनांचाही शौक आहे. महेश बाबू यांच्याकडे टोयोटा लँड क्रूझर V8, लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, BMW 730 LD, Mercedes-Benz GLS 450, Audi A8L सारखी अनेक वाहने आहेत. याशिवाय महेश बाबूंकडे स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे, जी सर्व सुविधांनी सज्ज आहे.

महेशची भेट 2002 मध्ये बी गोपालच्या ‘वामसी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नम्रतासोबत झाली आणि चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केले. अभिनेता दोन मुलांचा बाप आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, महेश बाबू लवकरच ‘सरकारू वारी पता’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.