Mahesh Tapase | स्वाभिमानी असाल तर घड्याळ ह्या निवडणूक चिन्हाचा त्याग करा

Mahesh Tapase – संविधानाचे मूल्य पायदळी तुडवणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने काल संविधानाचा फटकार दिला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

महेश तपासे ( Mahesh Tapase) म्हणाले की, खरी राष्ट्रवादी विरुद्ध डुप्लिकेट राष्ट्रवादी प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यावर न्यायमूर्तीने काल महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांना मिळालेला तुतारी वाजवणारा माणूस जे चिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी कायम ठेवून अन्य कुठल्याही पक्षाला ते वापरता येणार नाही.

पुढे महेश तपासे म्हणाले, अजित पवार गटाने अदृश्य शक्तीच्या मदतीने पवार साहेबांनी कष्टाने उभा केलेला मूळ राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह घड्याळ हडपले. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्ह घड्याळ हे सुपूर्त केले त्यावर शरद पवार साहेबांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे.

काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला व एक प्रकारचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला. घड्याळ या चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्राद्वारे जाहीर नोटीस प्रसारित करून त्यात घड्याळ चिन्ह संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे असे नमूद करण्यास अजित पवार गटाला आदेशित करण्यात आल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

संविधानाच्या दहाव्या सूचीचे पालन न झाल्यास पक्ष फोडीला चालना मिळेल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अजित पवार गटाला तसंच इतर पक्षातील बंडाळी मंडळींसाठी एक मोठी चपराक असल्याच्या टोला महेश तपासे यांनी लगावला.

स्वतःचे कर्तुत्व असते तर अजितदादांनी प्रेमाने वेगळे होण्याचा निर्णय घेऊन स्वतःचा पक्ष थाटला असता परंतु अदृश्य शक्तीच्या दबावाला बळी पडून पवार साहेबांना त्रास देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली याचेच सर्वाधिक दुःख आम्हा सर्वांना आहे असेही तपासे म्हणाले.

१९९९ साली स्वाभिमानाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली व तो स्वाभिमान पवार साहेबांनी कायम जपला. अजितदादांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक टक्का जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी घड्याळ या निवडणूक चिन्हाचा त्याग करून नवीन निवडणूक चिन्ह स्वीकारून आमच्या समोर निवडणुकीत उभे राहून दाखवावे असे आव्हान महेश तपासे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली