‘धर्मनिरपेक्ष सलमान’, भाचीला उचलून भाईजानने केली बाप्पाची आरती; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो 19 सप्टेंबर 2023, मंगळवारी साजरा केला गेला. हा 10 दिवसांचा गणोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरी गणपतीचे स्वागत केले आणि त्याची मूर्ती बसवली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खानच्या (Arpita Khan) घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी सलमानचं संपूर्ण कुटुंब तिच्या घरी गणपती बाप्पाच्या आरती आणि पूजेसाठी पोहोचली होती. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा यांनी मिळून गणपतीची आरती केली. या आरतीचा खास व्हिडीओ सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी सलमाननेही भाचीला खांद्यावर उचलून बाप्पाची मनोभावे आरती केली. ‘गणपती बाप्पा मोरया’ असं कॅप्शन लिहित त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सलमानच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मी धर्मनिरपेक्ष सलमान भाईचा चाहता असल्याचा मला अभिमान आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमान हा सर्वांत धरनिरपेक्ष भारतीय आहे’, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास