LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

LokSabha Election 2024 | महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट असलं तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) राज ठाकरे महायुतीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या भेटीने विरोधकांना पोटशूळ उठला असून विरोधी पक्षातील नेते हे भाजप आणि मनसेवर टीका करत आहेत. याच भेटीवरून उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी खरमरीत टीका केलीय. या भेटीमधून भाजपला कोणताही फायदा होणार नाही. भाजपचा महाराष्ट्रात भरवसा नाही, अशी टीका त्यांनी केलीय.

त्या म्हणाल्या, “भाजपला वाटत होतं की ठाकरे घराण्याचा पक्ष आहे. ठाकरे आडनाव घेतात. त्यामुळे ठाकरे यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेसमोर भारतीय जनता पक्ष शून्य आहे, असे सुरुवातीपासून म्हणत आले आहे. शिवसेना फोडण्याचे काम केले आणि गद्दार सेना निर्माण केली. त्यांच्याकडे शून्य मते आहेत. राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना घेतले. त्यांचीही मते शून्य आहे. राज ठाकरे हे ही शून्य आहे. त्यामुळे भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार, अशी  टीका त्यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई