Ajit Pawar | अजितदादा बदनामी प्रकरण : अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी युगेन्द्र पवारांना घेराव घालत विचारला जाब

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरदचंद्र पवार गटाचा प्रचार करीत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला.अजित पवार यांची सोशल मीडियावर जाणून-बहुजन बदनामी करत असल्याबाबत जाब विचारला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला.

बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी खालच्या पातळीवर जाऊन अजितदादांवर टीका केली होती. याचा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर तो जाणून बुजून व्हायरल केला जात होता म्हणून आज शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार हे आज सोमेश्वरनगर परिसरात प्रचार करीत असताना अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला.

आमच्यासाठी पवार कुटुंब आदर्शस्थानी असून आपले कार्यकर्ते अजितदादा यांची बदनामी करत आहेत असा आरोप करत कार्यकर्त्यांनी जाब विचारला. शरदचंद्र पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करू असे आश्वासन अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी तेथून काढता पाय घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली