प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ८ महिन्यांची होती गर्भवती

Actress Priya Death: मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. प्रिया हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Heart Attack) झाल्याचे समजत आहे. तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच तिला हृदयविकाराचा झटका आला.

रिपोर्टनुसार, अभिनेत्री 8 महिन्यांची गर्भवती होती. तिने अलीकडेच तिच्या गर्भधारणेची नियमितपणे रुग्णालयात तपासणी केली होती. यानंतर तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रियाचे नवजात बाळ सध्या आयसीयूमध्ये आहे, अशी माहिती समोर येत आहे.

प्रियाच्या आकस्मिक निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्री फक्त 35 वर्षांची होती. प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेते किशोर सत्या यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

अभिनेते किशोर सत्या यांनी दुजोरा दिला
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्रीचा फोटो शेअर करताना किशोर सत्याने लिहिले की, डॉ. प्रिया आठ महिन्यांची गरोदर होती आणि बुधवारी तिचा मृत्यू झाला. मूल आयसीयूमध्ये आहे, मुलाच्या जीवाला कोणाताही धोका नाही. काल मंगळवारी ती नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. अचानक हृदयविकाराचा झटका आला. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूचा धक्का एका आईला सहन होत नव्हता आणि ती रडत होती. प्रियाचा नवरा नन्ना सहा महिने तिच्यासोबत होता आणि पत्नी गमावल्याचे दुःख त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. तिला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. डॉ. प्रियाच्या मृत्यूच्या बातमीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. दवाखान्यात गेल्यावर जे काही पाहिलं ते पाहून मला दु:ख झालं.’

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!